जूनी पेन्शन लागू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:41 AM2021-05-23T04:41:27+5:302021-05-23T04:41:27+5:30
००० अनसिंग येथे आणखी ५ रुग्ण वाशिम : वाशिम तालुक्यातील अनसिंग येथे आणखी तीन जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे शनिवारी ...
०००
अनसिंग येथे आणखी ५ रुग्ण
वाशिम : वाशिम तालुक्यातील अनसिंग येथे आणखी तीन जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे शनिवारी समोर आले. आरोग्य विभागाने कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी केली.
000000
कलावंतांच्या समस्या सोडविण्याची मागणी
वाशिम : गेल्या १३ महिन्यांपासून प्रलंबित मानधनासह वृध्द कलावंत व साहित्यिक मानधन समिती गठीत करण्याच्या मागणीसाठी लोककलावंत संघटनेने विविध टप्प्यात आंदोलन केले. मात्र, याची दखल घेण्यात आली नाही. कलावंताना कमीत कमी पाच हजार रुपये दरमहा मानधन सुरु करावे अशी मागणी कलावंत संघटनेने शनिवारी केली.
०००००
पाणंद रस्त्याचे काम रखडले
वाशिम : देपूळ, अनसिंग, वारा जहॉगीर परिसरातील जुन्या पाणंद रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे पालकमंत्री योजनेतून या रस्त्याचे काम करण्याची मागणी शेतकर व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे शुक्रवारी केली आहे.
०००
लक्षणे असल्यास चाचणी करावी
वाशिम : मालेगाव शहर व तालुक्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. सर्दी, ताप व खोकला, घसा खवखवणे आदी लक्षणे असणाºया संदिग्ध रुग्णांनी कोरोना चाचणी करावी, असे आवाहन तालुका प्रशासनाने शनिवारी केले.
०००००००००००००००००००००
प्रोत्साहन अनुदानाची शेतकºयांना प्रतीक्षा
वाशिम : नियमीत कर्जफेड करणाºया वाशिम तालुक्यातील कार्ली परिसरातील अनेक शेतकºयांना प्रोत्साहन अनुदान अद्याप मिळाले नाही. प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी शेतकºयांनी शुक्रवारी केली.
०००००००००००००००
रेशन दुकानांमध्ये दरपत्रकाचा अभाव
वाशिम : किन्हीराजा, केनवड, रिठद, कवठा, हराळ, तोंडगाव, अनसिंग आदी जिल्हा परिषद गटातील अनेक रेशन दुकानांमध्ये दर्शनी भागात दरपत्रक लावण्यात आले नाही तसेच तक्रार पेटीदेखील ठेवण्यात आली नाही.
०००००००००००००००
गौंढाळा येथे दोन रुग्ण
वाशिम : रिसोड तालुक्यातील गौंढाळा येथे आणखी दोन जणांचा कोरोना चाचणी अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे. गौंढाळा येथे रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
०००००
बदली प्रक्रियेकडे शिक्षकांचे लक्ष
वाशिम : कोरोनाकाळात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या विनंती व प्रशासकीय बदल्या केव्हा होणार, याकडे शिक्षक व शिक्षक संघटनांचे लक्ष लागून आहे.
00
आरोग्य कर्मचाऱ्यांची पाच पदे रिक्त
वाशिम : उंबर्डा बाजार येथील आरोग्य केंद्रांतर्गत ५ पदे रिक्त आहेत. सद्यस्थितीत २ अधिकारी आणि ११ कर्मचारी येथे कार्यरत आहेत. रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे.
०००
चिखली परिसरात आणखी तीन रुग्ण
वाशिम : रिसोड तालुक्यातील चिखली परिसरात आणखी तीन जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे शनिवारी निष्पन्न झाले. चिखली- १, किनखेडा- १ व कवठा येथे एक रुग्ण आढळून आला. आरोग्य विभागातर्फे गावात सर्वेक्षण केले जात आहे.