वाकद येथील अवैध धंदे बंद करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:40 AM2021-05-10T04:40:53+5:302021-05-10T04:40:53+5:30
वाकद गावालगत वाडी तसेच बोरखेडी रस्त्यावर अनेक अवैध दारू विक्रेत्यांनी आपले व्यवसाय रस्त्यावर थाटले असून, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी ...
वाकद गावालगत वाडी तसेच बोरखेडी रस्त्यावर अनेक अवैध दारू विक्रेत्यांनी आपले व्यवसाय रस्त्यावर थाटले असून, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढण्यास ही बाब कारणीभूत ठरत आहे. यासह गावात वरली मटका, दारूविक्री सुरू असून, बुलडाणा व परभणी जिल्ह्यातून अनेक लोक वाकद येथे दररोज गर्दी करत आहेत. असे असताना प्रशासनाकडून कुठलीच कारवाई केली जात नसल्याने बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांचे फावत आहे. पोलीस प्रशासनाकडूनही वाकद गावात अद्यापपर्यंत कुठलीच मोठी कारवाई झालेली नाही. तथापि, या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवून अवैध धंदे तत्काळ बंद करावे, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.
...........................
कोट : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट गतीने वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस विभागाकडून सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत. वाकद या गावात सुरू असलेल्या अवैधधंद्यांवर लवकरच ठोस कारवाई करण्यात येईल. नागरिकांनीही स्वत:ची काळजी घेणे आवश्यक असून, पोलीस प्रशासनास सहकार्य करणे अपेक्षित आहे.
- एस.एम. जाधव
ठाणेदार, रिसोड पोलीस स्टेशन