जमिनीचा मोबदला देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:28 AM2021-07-15T04:28:14+5:302021-07-15T04:28:14+5:30
नालंदानगर ते चिखली रस्ता नादुरुस्त वाशिम : शहरातील नालंदानगर येथून चिखली गावाला जाणारा अंदाजे दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक ...
नालंदानगर ते चिखली रस्ता नादुरुस्त
वाशिम : शहरातील नालंदानगर येथून चिखली गावाला जाणारा अंदाजे दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय खराब झाला असून, यामुळे रहदारी प्रभावित झाली आहे. रस्ता त्वरित दुरुस्त करा अन्यथा मनसे स्टाइलने खड्ड्यात बसून असहकार आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे दिला आहे.
वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित
वाशिम : आसेगाव परिसरात दोन दिवसांपूर्वी रात्री वादळी वारा सुटला. यामुळे काही वेळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे ग्रामस्थांची गैरसोय झाली. तथापि, काही वेळानंतरच हा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला.
कामगारांना रोजगार देण्याची मागणी
वाशिम : कामरगाव परिसरातील गावातून रोजगारासाठी परजिल्ह्यात गेलेले शेकडो कामगार गावी परत आले आहेत. मात्र, परिसरात कोणतीच कामे नसल्याने हे कामगार वर्षभरापासून बेरोजगार आहेत. प्रशासनाने या कामगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.