पोलीस भरतीसह स्पर्धा परीक्षा घेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:28 AM2021-07-15T04:28:32+5:302021-07-15T04:28:32+5:30
निवेदनात नमूद आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव, मराठा आरक्षण आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे पदभरती, परीक्षा, नियुक्त्या रखडल्या आहेत. यामुळे राज्यातील ...
निवेदनात नमूद आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव, मराठा आरक्षण आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे पदभरती, परीक्षा, नियुक्त्या रखडल्या आहेत. यामुळे राज्यातील जवळपास १५ लाख विद्यार्थी हतबल झाले आहेत. कोरोनामुळे सर्वच कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. त्यातच मागील दोन ते तीन वर्षांपासून परीक्षा लांबणीवर जाणे, नियुक्त्या रखडणे, नवीन पदभरती न होणे हे विद्यार्थ्यासाठी भयावह आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक, आर्थिक तसेच मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे शासनाने एमपीएससी आणि महाआईटीच्या रखडलेल्या परीक्षा लवकर घ्याव्यात व अंतिम निकाल लावावे, अशी मागणी करण्यात आली.
.....................
पोलीस भरतीची अधिसूचना जारी करावी
कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे दोन वर्षे वाया गेले. त्यामुळे काही विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपू शकते. त्यासाठी वयोमर्यादेत २ वर्षांची वाढ करावी व लवकर यासंबंधीचा शासन आदेश काढावा. महाआईटी या सरकारी कंपनीवर एसआयटी लावावी व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही मनविसेने निवेदनात केली.