बारावीच्या परिक्षेबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:36 AM2021-05-22T04:36:59+5:302021-05-22T04:36:59+5:30
परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या जात असल्याने अभ्यासातही मन रमेनासे झाले आहे. मुलांच्या परीक्षेचा ताण पालकांवरही असतो. बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय ...
परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या जात असल्याने अभ्यासातही मन रमेनासे झाले आहे. मुलांच्या परीक्षेचा ताण पालकांवरही असतो. बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय होत नसल्याने सर्वांवरच टांगती तलवार आहे. विद्यार्थ्यांबरोबर पालकांचा विचार करून सरकारने लवकर ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. बारावीच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षण विभागाने सविस्तर माहिती आणि सूचना प्रसिद्ध करावी, अशी मागणीही होत आहे. परीक्षेसाठी शेवटच्या टप्यात तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यापूर्वी किमान १५ ते ३० दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) जूनच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेणार आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभाग आणि राज्य मंडळाकडून सीबीएसईच्या निर्णयाची वाट पाहण्यात येत आहे का, असाही सवाल उपस्थित केला जात असून विद्यार्थी संभ्रमात सापडले आहेत.