पाझर तलावाच्या भींतीेचे बांधकाम करण्याची मागणी
By Admin | Published: May 24, 2017 07:18 PM2017-05-24T19:18:06+5:302017-05-24T19:18:06+5:30
कारंजा लाड : मांडवा येथील पाझर तलावाच्या भिंतीचे बांधकाम वाशिम जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाने तात्काळ करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : तालुक्यातील ग्राम मांडवा येथील पाझर तलावाच्या वेस्ट वेअरमधील लेव्हर भिंतीचे बांधकाम वाशिम जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाने तात्काळ करावे अशी मागणी जानकराव नारायण भगत व ग्रामस्थांनी केली आहे.
निवेदनानुसार मांडवा येथे गावाला लागुन जि.प.लघुसिंचन पाझर तलाव आहे. या मधुनच ग्रामस्थांना ग्राम पंचायतमार्फत पिण्याच्या पाण्याचा दररोज पाणी पुरवठा केल्या जातो. गाव तथा परिसरातील गुराढोरांना ुसुध्दा याच तलावातील पिण्याच्या पाण्याचा उपयोग होतो. परंतु मागील काही वर्षापासून या पाझर तलावाच्या सांडव्यामधील अंदाजे दिड ते दोन फुट उंचीची लेव्हर भिंत ही पुराच्या पाण्याने वाहुन गेली, त्यामुळे तेव्हापासून तलावातकमी पाणी साठविल्या जाते. ही बाब जि.प.लघुसिंचन उपविभाग यांना माहित आहे. त्यांचेकडे पाझर तलावाच्या सांडव्यामधील अंदाजे दिड ते दोन फुटाच्या लेव्हर भिंतीचे बांधकाम केल्यास तलावातील पाण्याचे साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होवु शकते. तसेच पाझर तलावाच्या भिंती विरुध्द मागील दक्षीण टोकाला पंधरा ते विस शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर व शेततहे आहेत.
त्यामुळे त्या सर्वांच्या पाणी पातळीत वाढ होवुन शेतकऱ्यांना फायदा होवु शकतो. सांडव्यातील लेव्हर भिंतीचे बांधकाम करावे याकरिता ग्रा.पं. ने ठराव पारित करुन कार्यकारी अभियंता जि.प.लघुसिंचन विभाग वाशिम यांचेकडे प्रस्ताव पाठविला होता.
त्यांनी मांडवा येथील पाझर तलावाची पाहणी करुन मोजमाप केल्यानंतर मंजुरीतीकरिता विभागीय कार्यालयाक डे पाठविल्याचे लेखी पत्राव्दारे कळविले आहे. परंतु या बाबीस एक वर्ष उलटुन गेल्या नंतरही कोणत्याही प्रकारची पुढील कार्यवाही झाली नाही. करिता या प्रकाराची तात्काळ दखल घेवुन पाझर तलावाच्या सांडव्यामधील लेव्हर भिंतीचे बांधकाम तात्काळ सुरु करावे अशी मागणी संबंधीतांना पाठविलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.