खरेदी केंद्रावरील तुर मोजुन घेण्याची मागणी

By admin | Published: April 27, 2017 06:41 PM2017-04-27T18:41:32+5:302017-04-27T18:41:32+5:30

कारंजा लाड- नाफेड तुर खरेदी पुन्हा सुरु करुन यार्डवर शिल्लक असलेली तुर मोजुन घ्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते ओमप्रकाश तापडीया यांनी तहसीलदारांना केली आहे.

The demand for counting the lot in the shopping center | खरेदी केंद्रावरील तुर मोजुन घेण्याची मागणी

खरेदी केंद्रावरील तुर मोजुन घेण्याची मागणी

Next

कारंजा लाड : मागील तीन वर्षापासून आसमानी संकटाचा सामाना करत असलेल्या शेतकऱ्यांना यंदा सुलतानी संकटाने घेरले. परिणामी मुघलक शेती उत्पादन होवुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले नाही. आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनी भाव पाडले. शासनाने हमीभाव जाहीर करुन नाफेड केंद्र सुरु केली,परंतु कधी बारदान्याचा अभाव तर कधी साठवणीसाठी जागा नसल्याचे कारण पुढे करुन नाफेडव्दारे कासव  गतीने तुर खरेदी  केल्या गेली. उशिर का होईना पंरतु शेतमालाला योग्य भाव मिळण्याच्या अपेक्षेने अनेक शेतकरी नाफेड केंद्रावर तुर विकण्यासाठी थांबुन होते, परंतु शेतकऱ्यांच्या शेतातील शेवटचा दाणा विकेपर्यंत नाफेड खरेदी सुरु ठेवण्याच्या घोषणा करणाऱ्या शासनाला आपल्या वचनाचा विसर पडला असून २२ एप्रिल रोजी बंद केलेली नाफेड तुर खरेदी पुन्हा सुरु करुन यार्डवर शिल्लक असलेली तुर मोजुन घ्यावी  अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते ओमप्रकाश तापडीया यांनी २४ एप्रिल रोजी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. २२ एप्रिलनंतर कारंजा नाफेड तुर खरेदी केंद्राच्या यार्डवर चार हजार क्विंटल तुर मोजणीच्या प्रतिक्षेत आहे या तुरीचे मोजमाप करुन घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: The demand for counting the lot in the shopping center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.