मंदिर काम पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:42 AM2021-04-20T04:42:36+5:302021-04-20T04:42:36+5:30
कारंजा तालुक्यात सोमठाना परिसरात हेंबाडपंथी ऐतिहासिक रापेरी महादेव संस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्रावण महिन्यात दर सोमवारी यात्रा भरून दूरवरून ...
कारंजा तालुक्यात सोमठाना परिसरात हेंबाडपंथी ऐतिहासिक रापेरी महादेव संस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्रावण महिन्यात दर सोमवारी यात्रा भरून दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात. कारंजा लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने या परिसरात सिंचन तलाव तयार करण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. जलसिंचन तलावाच्या उद्घाटन कार्यक्रमाकरिता आमदार राजेंद्र पाटणी आले असता गावकऱ्यांसमक्ष लघु पाटबंधारे विभाग कारंजाचे कार्यकारी अभियंता चैधरी यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले होते की, जलसिंचन तलावाचे काम होण्यापूर्वी मंदिराचे काम पूर्ण करण्यात येईल. मात्र, तसे न करता मंदिर ज्या अवस्थेत होते, त्या ठिकाणची पूर्ण माती काढून मंदिर उघड्यावर करण्यात आले. आता मंदिराच्या भोवताल भिंत बांधल्याशिवाय मंदिर टिकणार नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी मंदिराचे काम पूर्ण करा, अशी मागणी गावकरी करीत आहेत.
कोट
पुरातन मंदिराचे काम सुरू असून येत्या पावसाळ्यापूर्वी मंदिराचे काम सुरक्षित पातळीपर्यंत पूर्ण करण्यात येईल.
वीरेंद्र चैाधरी,
कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग कारंजा.