दुष्काळी सवलतींचा लाभ देण्याची मागणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:39 AM2021-05-24T04:39:48+5:302021-05-24T04:39:48+5:30

000000 गुटखाविक्री खुलेआम सुरूच वाशिम : वाशिम, कारंजा शहरात मध्यंतरी गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केली होती. मात्र, आता पुन्हा ...

Demand for drought relief! | दुष्काळी सवलतींचा लाभ देण्याची मागणी !

दुष्काळी सवलतींचा लाभ देण्याची मागणी !

Next

000000

गुटखाविक्री खुलेआम सुरूच

वाशिम : वाशिम, कारंजा शहरात मध्यंतरी गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केली होती. मात्र, आता पुन्हा गुटखाविक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

०००

उपबाजारांची अवस्था वाईट

वाशिम : जिल्ह्यातील पाच उपबाजारांपैकी तीन उपबाजारांची अवस्था वाईट आहे. या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने शेतमाल विक्रीस येणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी शनिवारी केली.

०००००००००००००००

कारखेडा येथे चार कोरोना पॉझिटिव्ह

वाशिम : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मानोरा तालुक्यातील कारखेडा येथे २३ मे रोजी प्राप्त अहवालानुसार, चारजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आरोग्य विभागाची चमू गावात दाखल झाली असून, तपासणी सुरू केली.

०००००००

ज्येष्ठांनी अधिक सतर्क राहावे !

वाशिम : कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी धोका कायम आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोना संसर्गाची लागण लवकर होते. त्यामुळे लक्षणे असल्यास तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

०००००

आययूडीपीमधील नाल्यांची सफाई नाही

वाशिम : मान्सूनपूर्व कामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना दिलेल्या आहेत. वाशिम शहरातील जुनी आययूडीपी कॉलनी परिसरात घाण पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची सफाई अद्याप करण्यात आली नाही.

०००००००

शिरपूर येथे आरोग्य तपासणी

वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे आणखी चार जणांचा कोरोना चाचणी अहवाल दि. २३ मे रोजी पॉझिटिव्ह आला आहे. आरोग्य विभागाने कोरोनाबाधितांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी केली आहे.

००००००००००

अनुदान प्रलंबित; लाभार्थी त्रस्त

वाशिम : विविध योजनेतील घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही वाशिम तालुक्यातील जवळपास २०० लाभार्थींना दुसऱ्या टप्प्यातील अनुदान मिळाले नाही. कडक निर्बंधामुळे शासकीय कार्यालयेदेखील बंद असल्याने लाभार्थींची गैरसोय होत आहे. अनुदान तातडीने देण्याची मागणी लाभार्थींनी शनिवारी केली.

०००००००००

गोरगरिबांना किराणा किटचे वाटप (फोटो)

वाशिम : कोरोना महामारीमुळे गोरगरिबांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर श्री सत्यसाई सेवा समिती सोनखास यांच्यातर्फे २१ मे रोजी गोरगरिबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. कोरोनाकाळात श्री सत्यसाई सेवा समितीतर्फे गरजूंना मदतीचा हात देऊन माणुसकीचा परिचय दिला जात आहे.

Web Title: Demand for drought relief!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.