स्मशानभूमी, शेड उभारण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:42 AM2021-07-27T04:42:41+5:302021-07-27T04:42:41+5:30
सापाला न मारता संपर्क साधा वाशिम : सध्या पावसाळ्याचे दिवस असून, विविध प्रजातींचे साप आढळत आहेत. साप हा ...
सापाला न मारता संपर्क साधा
वाशिम : सध्या पावसाळ्याचे दिवस असून, विविध प्रजातींचे साप आढळत आहेत. साप हा शत्रू नसून मित्र आहे. त्यामुळे त्यास जीवे न मारता, आपणास संपर्क साधावा, असे आवाहन सर्पमित्र मो.समीर यांनी केले आहे. वाशिम परिसरात आढळणाऱ्या सापांना एकबुर्जी प्रकल्पानजीक सुरक्षितस्थळी सोडले जाते.
आदिवासी गावे विकासापासून दूरच
वाशिम : जिल्ह्यातील मानोरा आणि मालेगाव या दोन तालुक्यांमध्ये आदिवासीबहुल सुमारे ३४ गावे आहेत. शिक्षण व अन्य स्वरूपातील मूलभूत सुविधा या गावांमध्ये अद्यापपर्यंत पोहोचल्या नाहीत. ही गावे आजही विकासापासून कोसोदूर असल्याचे दिसून येत आहे. विकासात्मक योजनांची अंमलबजावणी चोखपणे होत नसल्याने, आदिवासी समाजातील नागरिकांना आजही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा
वाशिम : प्रधानमंत्री कुसुम योजना व महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत राज्यात सौर कृषिपंप जोडणीसाठी बनावट व फसव्या वेबसाइट (संकेतस्थळे), मोबाइल अॅप बनवून लाखो रुपयाने फसवणूक केली जात आहे, ती थांबविण्याची मागणी हाेत आहे.