गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी मुदत वाढविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:40 AM2021-01-25T04:40:47+5:302021-01-25T04:40:47+5:30
शासनाकडून इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अल्पसंख्यांक गुणवत्ता शिष्यवृत्ती, तर इयत्ता नववीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती ...
शासनाकडून इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अल्पसंख्यांक गुणवत्ता शिष्यवृत्ती, तर इयत्ता नववीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिल्या जाते. यंदा या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ जानेवारी मुदत होती. त्या अनुषंगाने शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यासाठी तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र व बँक पासबुक ही कागदपत्रे अनिवार्य करण्यात आले आहे. ग्रामीण भागात बहुतांश विद्यार्थ्यांकडे जातीचे प्रमाणपत्र नसून, ते काढण्यासाठी जवळपास आठवडाभराचा कालावधी लागत असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची मुदत निघून गेली आहे. मुदत निघून गेल्याने ग्रामीण भागातील अध्याहून अधिक विद्यार्थ्यांवर शिष्यवृत्ती योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी पालकवर्गाकडून करण्यात आली आहे.