जुन्या दराने खत मिळण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:40 AM2021-05-23T04:40:59+5:302021-05-23T04:40:59+5:30
सन २०२१-२२ च्या खरीप हंगामात लागणाऱ्या रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड वाढ करण्यात आली. दरवाढ रद्द करण्याची मागणी शेतकरी करीत ...
सन २०२१-२२ च्या खरीप हंगामात लागणाऱ्या रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड वाढ करण्यात आली. दरवाढ रद्द करण्याची मागणी शेतकरी करीत होते. दुसरीकडे तालुक्यात काही मोठ्या कास्तकारांनी जुन्या दराने असलेल्या मालाची खरेदी केली तर काहींतर्फे नवीन दराप्रमाणे खरेदी करण्यास सुरुवात करण्यात आली. शासनाने डि.ए.पी खतावरील सबसिडीमध्ये वाढ केली आहे. जुन्या किमतीत खते मिळणार असल्याने शेतकऱ्यांत एकीकडे समाधानाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे जुन्या दराने खते मिळत नाहीत. दुकानदारातर्फे खताच्या बॅगवर असणाऱ्या किमतीत खताची विक्री केली जात असून बॅगवर नवीन किंमत असल्याने आता शेतकरी या किमतीत खते घेण्यास तयार नाहीत. तर व्यापाऱ्यांतर्फे जुन्या दराच्या किमतीचा माल उपलब्ध झाल्यानंतरच विक्री करण्यास येणार आहे. तसेच वरून आदेश आल्यानंतर जुन्या दरात खत मिळणार आहे.