डाॅक्टरांची रिक्त पदे भरण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:42 AM2021-04-20T04:42:58+5:302021-04-20T04:42:58+5:30
डाॅक्टरांची रिक्त पदे भरण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांमधून होत आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा दिवसरात्र ...
डाॅक्टरांची रिक्त पदे भरण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांमधून होत आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा दिवसरात्र झटत आहे. दुसरीकडे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांत मिळून विविध वर्गांतील डॉक्टरांची ३१ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ११ पदे रिक्त आहेत. त्यात प्रामुख्याने सोनोग्राफी तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, गायनॅकोलॉजिस्ट आदींचाही समावेश आहे. त्यातच काही नियुक्त केलेले डॉक्टर्स कर्तव्यावर रुजूच झाले नाहीत. त्यामुळे रुग्णांवर योग्य उपचार करण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपूर्वी कंत्राटी पद्धतीने काही पदे भरण्यात आली असून, आयसीयू कक्षातही स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत. डाॅक्टर व कर्मचाऱ्यांची पदे भरण्याची मागणी होत आहे.