‘फायर ऑडिट’ करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:28 AM2021-07-02T04:28:14+5:302021-07-02T04:28:14+5:30
................ जऊळका येथे रस्त्यांची दुरवस्था जऊळका रेल्वे : गावातील अंतर्गत रस्ते आधीच खराब झाले होते. आता अधुनमधून कोसळत असलेल्या ...
................
जऊळका येथे रस्त्यांची दुरवस्था
जऊळका रेल्वे : गावातील अंतर्गत रस्ते आधीच खराब झाले होते. आता अधुनमधून कोसळत असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर चिखल साचून अधिकच दुरवस्था झाली आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
..............
बसफेऱ्या नियमित सोडण्याची मागणी
वाशिम : एस. टी. महामंडळाच्या वाशिम, रिसोड आगारातील अकोला, शिरपूर मार्गावरच्या काही दैनंदिन बसफेऱ्या अनियमित आहेत. त्या नियमित सोडण्यात याव्यात, अशी मागणी आकाश कांबळे यांनी बुधवारी केली.
..................
रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी
मालेगाव : तालुक्यात पटवारी, कृषी सहायक, सचिव यासारख्या महत्त्वाच्या पदांवर प्रभारी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्यावर गाव विकासाची भिस्त आहे. रिक्त पदे भरण्याची मागणी राजाराम टोंचर यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
................
‘बेटी बचाओ...’ मोहिमेची जनजागृती आवश्यक
मेडशी : शासनाने स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना यशस्वी होण्यासाठी व्यापक जनजागृती व्हावी, अशी मागणी प्रवीण गोटे यांनी बुधवारी केली.
.....................
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची अद्याप प्रतीक्षा
वाशिम : शासनाच्या विविध योजनेंतर्गत तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अद्यापपर्यंत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली नाही. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनीच आता दखल घेण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.
..................
ग्रामीण भागात सिलिंडरची बेकायदा वाहतूक
किन्हीराजा : ज्वलनशिल वायू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅस-सिलिंडरची ग्रामीण भागात बेकायदा वाहतूक केली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू पाहणारा हा प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.
.................
वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी
मालेगाव : मालेगावला नगर पंचायतीचा दर्जा मिळाला. त्यानुषंगाने आता वाहतूक समस्येचा नव्याने विचार करून नियोजन करण्याची गरज निर्माण आहे. दैनंदिन विस्कळीत होणारी वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.
...............
आरोग्यविषयक योजनेची अंमलबजावणी व्हावी
वाशिम : गोरगरीब रुग्णांना मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेता यावा, शासनाने अंमलात आणलेल्या आरोग्यविषयक योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी उमेश कुटे यांनी केली.
...................
अवाजवी वीज देयक; ग्राहक त्रस्त
शेलुबाजार : वापराच्या तुलनेत अधिक प्रमाणात विद्युत देयक येत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. वापरावर आधारित योग्य वीज देयके दिली जावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी मंगळवारी महावितरणकडे केली.
...............
अवैध प्रवासी वाहतूक जोमात
मेडशी : मालेगाव-मेडशी, मालेगाव- वाशिम आदी मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी युवा सेनेच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली.
..............
निवासस्थानांची दुरूस्ती करण्याची मागणी
मंगरुळपीर : येथील पोलीस कर्मचारी निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविलेला आहे; मात्र अद्याप निवासस्थानांची दुरुस्ती झाली नाही.
...................
उपकेंद्राची क्षमता वाढविण्याबाबत निवेदन
वाशिम : राजगाव येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रावरून विजेची होणारी मागणी व पुरवठ्यातील असमतोल पाहता, वीज उपकेंद्राची क्षमता वाढवून देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
.............
प्रमुख चौकांचे सौंदर्यीकरण रखडले
वाशिम : शहरातील प्रमुख चौकांचे विद्रुपीकरण झाले आहे. यासह वाहतुकीचाही बिकट प्रश्न उभा ठाकला आहे. प्रमुख चौकांचे सौंदर्यीकरण करून वाहतूक सुरळीत ठेवावी, अशी मागणी अनिल चव्हाण यांनी नगर परिषदेकडे बुधवारी केली.