बारा बलुतेदार यांना शासनाने मदत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:40 AM2021-05-26T04:40:46+5:302021-05-26T04:40:46+5:30

बारा बलुतेदार कुंभार, चांभार, गुरव, सोनार, परीट(धोबी), न्हावी, सुतार, लोहार, कोळी, चौगुला तसेच आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांची कोरोना ...

Demand for help from Bara Balutedar | बारा बलुतेदार यांना शासनाने मदत करण्याची मागणी

बारा बलुतेदार यांना शासनाने मदत करण्याची मागणी

googlenewsNext

बारा बलुतेदार कुंभार, चांभार, गुरव, सोनार, परीट(धोबी), न्हावी, सुतार, लोहार, कोळी, चौगुला तसेच आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांची कोरोना काळात आर्थिक घडी ही पार कोलमडून गेली आहे. हातावर उदरनिर्वाह करणाऱ्या ह्या समाजांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहेत. गेली कित्येक दशके आणि पिढ्यानपिढ्या हा समाज दुर्लक्षितच राहिला. अल्पसंख्याक असल्या कारणाने यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य कुठल्याही पक्षाने वा नेत्यांनी आजपर्यंत केले नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून आज एवढी वर्षे होऊन देखील हे बारा बलुतेदार आजही दुर्लक्षितचं राहिले. या कोरोनासारख्या महामारीत या समाजाला शासनाने हातभार लावून प्रत्येकी किमान दहा हजार रुपये मदत करावी व या समाजाला मुख्य प्रवाहात आणून सक्षम करावे, अशी मागणी भगवान सेना जिल्हाध्यक्ष सुनील लक्ष्मणराव कायंदे यांनी केली आहे

Web Title: Demand for help from Bara Balutedar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.