विमुक्त जातीला तत्काळ नॉन क्रिमिलेअरमधून वगळण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:51 AM2021-07-07T04:51:02+5:302021-07-07T04:51:02+5:30

नॉन क्रिमिलेअरच्या जाचक अटीमुळे समाजातील मुला-मुलींचे शिक्षण आणि नोकरीत अडथळा येत आहे. महाराष्ट्र सरकारने महसूल व वन विभागाला ४ ...

Demand for immediate exclusion of the deprived caste from the non-criminal layer | विमुक्त जातीला तत्काळ नॉन क्रिमिलेअरमधून वगळण्याची मागणी

विमुक्त जातीला तत्काळ नॉन क्रिमिलेअरमधून वगळण्याची मागणी

Next

नॉन क्रिमिलेअरच्या जाचक अटीमुळे समाजातील मुला-मुलींचे शिक्षण आणि नोकरीत अडथळा येत आहे. महाराष्ट्र सरकारने महसूल व वन विभागाला ४ जानेवारी २०२१ रोजी दिलेल्या आदेशानुसार निर्णय घेऊन समस्त नागरिकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र सदर आदेशाप्रमाणे महसूल आणि सेतू सुविधा केंद्राकडून पालन होत नसून नागरिकांना नॉन क्रिमिलेअर देताना आई-वडील यांचे शेती व नोकरीचे उत्पन्न वगळता अर्जदाराचे अन्य स्रोत विचारात घेणे आवश्यक आहे, असे स्पष्टपणे अधिसूचनेत नमूद असताना, महसूल व सेतू सुविधा केंद्राकडून पालन होत नाही. याकरिता तत्काळ परिपत्रक काढून राज्यभर सूचना द्याव्यात. जेणेकरून विमुक्त भटक्या समाजालाच नव्हे, तर संपूर्ण ओबीसी समाजाला दिलासा मिळेल. केंद्र सरकारने ६ लाखांची उत्पन्न मर्यादा वाढवून ८ लाख केली आहे, मात्र या स्थितीला तीन वर्षे झाली आहेत. त्यामुळे ८ लाखांवरून १२ लाख मर्यादा करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

Web Title: Demand for immediate exclusion of the deprived caste from the non-criminal layer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.