प्रोत्साहन अनुदानाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:27 AM2021-06-22T04:27:19+5:302021-06-22T04:27:19+5:30

शासकीय समित्यांच्या गठनाची प्रतीक्षा! वाशिम : महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर पूर्वीच्या ...

Demand for incentive grants | प्रोत्साहन अनुदानाची मागणी

प्रोत्साहन अनुदानाची मागणी

Next

शासकीय समित्यांच्या गठनाची प्रतीक्षा!

वाशिम : महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर पूर्वीच्या विविध समित्या बरखास्त झाल्या. संजय गांधी निराधार योजना यासह तालुकास्तरावर विविध समित्यांचे गठन अद्याप झाले नसल्याने या समित्यांचे गठन केव्हा होणार, याकडे लाभार्थींचे लक्ष लागून आहे.

अनसिंग परिसरातील रस्त्यांची दुरवस्था

वाशिम : अनसिंग परिसरातील ग्रामीण रस्त्यांची दैन्यावस्था झाली आहे. इतर गावांना जोडणारे रस्ते दयनीय अवस्थेत आहेत. खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे, तरी संबंधितांनी रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी आहे.

पोलीस स्टेशन चौकात दुभाजकाची गरज

वाशिम : संभाव्य अपघात टाळण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन चौक परिसरात रस्ता दुभाजक टाकण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. यासंदर्भात बांधकाम विभागाला सोमवारी नागरिकांनी निवेदनही दिले.

Web Title: Demand for incentive grants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.