सिंचन विहीर वाटपाची चौकशी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:25 AM2021-07-05T04:25:45+5:302021-07-05T04:25:45+5:30
सिंचन विहीर वाटपासाठी लाभार्थी निवड प्रक्रियेत घोळ झालेला आहे. अनेक ठिकाणी सरपंच व सचिवानी संगनमत करून अपात्र लाभार्थी पात्र ...
सिंचन विहीर वाटपासाठी लाभार्थी निवड प्रक्रियेत घोळ झालेला आहे. अनेक ठिकाणी सरपंच व सचिवानी संगनमत करून अपात्र लाभार्थी पात्र ठरविले. पैसा, राजकारण आणि वशिलेबाजी करून विहिरी मंजूर करण्यात आल्या. पात्र असूनही अनेक शेतकरी यामुळे लाभापासून वंचित राहिले. सर्व पात्र लाभार्थींची यादी करून तालुका स्तरावर अथवा जिल्हा स्तरावर ईश्वर चिठ्ठीव्दारे अंतिम लाभार्थी निवड होणे अपेक्षित होते; मात्र प्रशासनाने अंतिम लाभार्थी निवडीचे अधिकार ग्रामपंचायत स्तरावर दिल्याने सिंचन विहिरी वाटपात गोंधळ उडाला. या सर्व बाबींची चाैकशी व्हावी, अशी मागणी भुतेकर यांनी केली आहे.
....................
रोहयो मंत्र्यांकडून चाैकशीचे आदेश
विष्णुपंत भुतेकर यांच्या निवेदनाची रोहयोमंत्री संजय बनसोड यांनी तत्काळ दखल घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी उचित कार्यवाही करून तसा अहवाल सादर करावा, असे निर्देश दिल्याची माहिती भुतेकर यांनी दिली.