विकास कामातील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:37 AM2021-04-14T04:37:48+5:302021-04-14T04:37:48+5:30
कुऱ्हा येथील ग्रामपंचायत अंतर्गत सन २०१७-१८ पासून विविध विकास कामे करण्यात आलेली आहे. सदर कामाच्या दर्जामध्ये कमालीच तफावत आहे. ...
कुऱ्हा येथील ग्रामपंचायत अंतर्गत सन २०१७-१८ पासून विविध विकास कामे करण्यात आलेली आहे. सदर कामाच्या दर्जामध्ये कमालीच तफावत आहे. गावातील सिमेंट काँक्रीट रस्ते, स्मशानभूमीचे काम, अंगणवाडी आदी रस्त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी लेखी तक्रारीद्वारे गटविकास अधिकारी ,सभापती यांच्याकडे केली आहे. गावातील स्मशानभूमीत, अंगणवाडी, सिमेंट काँक्रीट रस्ते वाळूऐवजी गिट्टी भुसा यांनी केल्याने कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. गावातील विकासकामाचे कंत्राटदार गावामध्ये कधीच फिरकत नसल्याची तक्रार डाॅ. रमेश जुमडे यांनी केले. गावातील भर वस्तीमध्ये प्रकाश नागरे यांच्या घराशेजारी सुमारे चाळीस घरांचे सांडपाणी साचल्याच्या तक्रारी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांच्याकडेकरून सुध्दा चौकशी झाली नाही. ग्रामस्थांनी आता ग्रामपंचायतच्या गैरव्यवहाराची तक्रार थेट पंचायत समितीकडे केली आहे.