नाला बांधकामाची चौकशी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:27 AM2021-07-01T04:27:38+5:302021-07-01T04:27:38+5:30
निवेदनात म्हटले आहे की, नाला बांधकामासाठी अंदाज पत्रकामध्ये नमूद बांधकाम साहित्य वापरण्यात आले नाही. गज, सिमेंट आणि रेती हे ...
निवेदनात म्हटले आहे की, नाला बांधकामासाठी अंदाज पत्रकामध्ये नमूद बांधकाम साहित्य वापरण्यात आले नाही. गज, सिमेंट आणि रेती हे साहित्य निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात बांधकाम वाहून गेले. सदर घटनेची ध्वनीचित्रफित उपलब्ध आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. संबंधित कंत्राटदाराने लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून याप्रकरणाची वाच्यता होऊ न देता, थातूर-मातूर दुरुस्ती करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालविला आहे. तथापि, विकास कामामध्ये भ्रष्टाचार होऊन जनतेच्या पैशाचा अपहार होत आहे. संबंधित ठेकेदाराविरुद्ध व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशाराही शंकर वानखेडे यांनी दिला आहे.
...................
पूर आल्यास उद्भवणार संकट
वाळकी (मजरे) येथे काहीच दिवसांपूर्वी नाला बांधकाम करण्यात आले ; मात्र निकृष्ट दर्जा असलेले हे बांधकाम पहिल्याच पावसात वाहून गेले. त्यामुळे यापुढे पूर परिस्थिती निर्माण झाल्यास या भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांवर संकट कोसळणार असल्याचे बोलले जात आहे.