नगरपरिषदेकडून चौकशी अहवालाची मागणी

By admin | Published: May 24, 2017 07:42 PM2017-05-24T19:42:43+5:302017-05-24T19:42:43+5:30

रस्त्याच्या कडा भरणीत मातीचा वापर : नगराध्यक्ष आक्रमक

Demand for inquiry report from Municipal Council | नगरपरिषदेकडून चौकशी अहवालाची मागणी

नगरपरिषदेकडून चौकशी अहवालाची मागणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम शहरामध्ये सुरु असलेल्या रस्ता कामे करतांना रस्त्याच्या कडा भरण्यासाठी मातीचा वापर केल्या जात असल्याचे वृत्त लोकमतने २४ मे रोजीच्या अंकात प्रकाशित केल्याबरोबर नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी स्वत:हून भ्रमणध्वनी करुन याप्रकरणाची माहिती जाणून घेतली. तसेच वाशिम नगरपरिषदेचे श्रेणी क चे नगर अभियंता विजय घुगरे यांनी बांधकाम विभागाकडे कामाची पाहणी करुन चौकशी अहवाल मागविणार असल्याची माहिती दिली.
लोकमतच्यावतिने २२ मे पासून ह्यविकासाचे भिज घोंगडेह्ण वृत्तमालीका सुरु करण्यात आली. यामध्ये शहरात सुरु असलेली थातूर-मातूर विकास कामांवर प्रकाश टाकण्यात आला. या संदर्भात वृत्त प्रकाशित केल्याबरोबर त्या त्या दिवशी संबधित अधिकारी यांनी भेट दिली असता निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे निष्पन्न झाल्याने सदर काम बंद करुन व झालेले काम तोडून पुन्हा दुसऱ्या करण्याच्यासूचना सुध्दा संबधित ठेकेदाराला देण्यात आल्यात. तसेच कामांवर अकुशल मजुर कामे करीत असल्याचेही लोकमतने उघडकीस आणले होते. सदर मजुरांना सुध्दा काढून टाकण्यात आले. रस्ता काम पूर्ण होण्याआधीच रस्त्याच्या कडा भरतांना नालीबांधकामासाठी खोदण्यात आल्यानंतर निघालेल्या मातीचा वापर भरण्यासाठी करण्यात आला. याचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी संपूर्ण माहिती जाणून भागाची पाहणी नगरपरिषद अधिकाऱ्यांना सोबत घेवून करणार असल्याचे सांगितले. तर नगर अभियंता विजय घुगरे यांनी सदर प्रकाराबाबत बांधकाम विभागाला आपण चौकशी अहवाल मागून निर्णय घेणार असल्याचे सांगितल्याने सदर प्रकरण चांगलेच चिघडले आहे. शहरातील विकास कामे टिकाऊ, मजबुत व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी यावेळी सांगितले.

 

Web Title: Demand for inquiry report from Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.