पदोन्नतीतील आरक्षण कायम ठेवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:41 AM2021-05-23T04:41:19+5:302021-05-23T04:41:19+5:30

मागासवर्गीय आरक्षण समितीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेऊन ७ मे २०२१ चा निर्णय रद्द करून मागासवर्गीय ...

Demand to maintain reservation in promotion | पदोन्नतीतील आरक्षण कायम ठेवण्याची मागणी

पदोन्नतीतील आरक्षण कायम ठेवण्याची मागणी

Next

मागासवर्गीय आरक्षण समितीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेऊन ७ मे २०२१ चा निर्णय रद्द करून मागासवर्गीय पदोन्नती सुरू करण्याचा निर्णय न घेता विधी व विभागाचा अभिप्राय घेण्याचा घाट घातला आहे; तर विधी व न्याय आणि अॅडव्होकेट जनरल यांनी संगममत करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाविरोधात अभिप्राय देऊन मागासवर्गीयांची पदोन्नती थांबवली आहे. तथापि, जोपर्यंत मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षण पुर्ववत करण्याचा निर्णय सरकार घेत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील व ते यापुढे आणखी तीव्र केले जाईल, असा निर्णय आरक्षण हक्क कृती समितीने घेतला असून त्याबाबत २१ मे रोजी तहसीलदार अजित शेलार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा समन्वयक निलेश पुंड, प्राचार्य रमेश काळदाते, प्रा. रमेश टाक, डी. खोडवे, सुधाकर कोल्हे, गजानन लांबाडे, केशव इरतकर, श्रीकांत काळदाते उपस्थित होते.

Web Title: Demand to maintain reservation in promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.