ग्रामस्थांना काेराेना लस उपलब्ध करून देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:43 AM2021-05-27T04:43:07+5:302021-05-27T04:43:07+5:30
माहुली या गावात तीन वेळा कोरोना ग्रामस्थांची काेराेना चाचणी करण्यात आली; मात्र लस देण्यासाठी एकदाच १४ एप्रिल राेजी कॅम्पचे ...
माहुली या गावात तीन वेळा कोरोना ग्रामस्थांची काेराेना चाचणी करण्यात आली; मात्र लस देण्यासाठी एकदाच १४ एप्रिल राेजी कॅम्पचे आयाेजन करण्यात आले हाेते. या वेळी अनेक ग्रामस्थ लस घेऊ शकले नाहीत. गावात तीन वेळा झालेल्या कोरोना चाचणीत जवळपास १० ते १५ नागरिक पाॅझिटिव्ह आढळले, त्यांना शासकीय नियमानुसार गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. १४ एप्रिलला केवळ ५० नागरिकांना लस देण्यात आली हाेती. गावात हजारो नागरिक लसीपासून वंचित आहेत. ज्या नागरिकांनी प्रथम डोस घेतला आहे त्यांना ४४ दिवस होऊनसुद्धा दुसरा डाेस अद्याप मिळालेला नाही. तरी आराेग्य विभागाने गावात लसीकरणासाठी शिबिर आयाेजित करून लस उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
---------------