सोयाबीन बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:39 AM2021-04-25T04:39:40+5:302021-04-25T04:39:40+5:30

राज्य शासनाने शेतकऱ्यांना पेरणीसाठी सोयाबीन बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी येथील युवा शेतकरी नितीन पाटील उपाध्ये ...

Demand for making soybean seeds available at discounted rates | सोयाबीन बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्याची मागणी

सोयाबीन बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्याची मागणी

Next

राज्य शासनाने शेतकऱ्यांना पेरणीसाठी सोयाबीन बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करुन

द्यावे अशी मागणी येथील युवा शेतकरी नितीन पाटील उपाध्ये यांनी केली आहे .

शेतकऱ्यांकडून काजळेश्वर परिसरात सोयाबीनची पेरणी मोठया प्रमानात होते. त्यामुळे पेरणीला एकरी ३० ते ३५ किलो बियाणे लागते. गतवर्षी पावसाने काढणीचे वेळी सोयाबीन खराब केले. त्यामुळे बहूतांश शेतकरीकडे पेरणीला घरचे बियाणे नाही. गतवर्षी या भागातील शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादनही फारसे झाले नाही. कर्ज भरणे, देणी

देणे या करीता त्यांना तेव्हाच सोयाबीन विकावे लागले. हमी भावापेक्षा

कमी भावात सोयाबीन विकल्याने

आताच्या वाढीव भावाचा फायदा

शेतकऱ्यांना झाला नाही .सद्या सोयाबीनचे भाव चढत असल्याने

बियाण्याचे भाव चढे राहतील अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. अशी स्थीती असल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी सोयाबीन बियाणे सवलतीच्या दरात शासनाने उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नितीन उपाध्ये यांनी केली आहे.

Web Title: Demand for making soybean seeds available at discounted rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.