भाडेपट्टीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्याकडून पैशांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:42 AM2021-02-24T04:42:48+5:302021-02-24T04:42:48+5:30
मालेगाव तालुक्यातील डही येथील रमेश अवचार मालेगाव येथील बसस्थानकातील मधील कॅन्टीनची भाडेपट्टी करावयाची होती. यासाठी ते शिरपूर येथील ...
मालेगाव तालुक्यातील डही येथील रमेश अवचार मालेगाव येथील बसस्थानकातील मधील कॅन्टीनची भाडेपट्टी करावयाची होती. यासाठी ते शिरपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात ३ फेब्रुवारी रोजी आले होते. काम झाल्यानंतर एका कर्मचाऱ्याने त्यांना ६०० रुपयांची मागणी केली. त्यावेळी रमेश अवचार यांनी आपल्याकडे पैसे नाहीत. तुमचा मोबाईल नंबर द्या त्यावर फोनपे द्वारे रक्कम पाठवितो, असे म्हटले. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावर अधिकाऱ्यांनी पैसे नसतील तर राहू द्या असे म्हणून आपल्याकडून पैसे घेतले नाही. मात्र यावरून असे स्पष्ट होते की शिरपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात पैशाची मागणी करण्यात येते. त्यामुळे या ऑफिसमध्ये येथे पैसे देण्याची गरज नाही , असा बोर्ड लावण्यात यावा. जेणेकरून जयंतीची लुबाडणूक होणार नाही. अशी मागणी वजा तक्रार २२ फेब्रुवारी रोजी तहसीलदार मालेगाव यांच्याकडे रमेश अवचार यांनी केली आहे.