मंदिरे दर्शनासाठी खुली करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:39 AM2021-08-29T04:39:47+5:302021-08-29T04:39:47+5:30
............ बाजारपेठेत गर्दी न करण्याचे आवाहन वाशिम : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता नियंत्रणात आहे; मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता ...
............
बाजारपेठेत गर्दी न करण्याचे आवाहन
वाशिम : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता नियंत्रणात आहे; मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असून नागरिकांनी नियमांचे पालन करावे. बाजारपेठेत अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले.
................
जुने शहरातील रस्त्यांची दुरवस्था
वाशिम : जिल्हा मुख्यालय असलेल्या वाशिममधील जुने शहरातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून वाहनचालकांची गैरसोय होत आहे. स्थानिक नगर पालिकेने या समस्येकडे लक्ष पुरवून रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
...........
कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शिबिर
वाशिम : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत मिळणाऱ्या लाभासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करता येणे सोयीचे व्हावे, यासाठी काही गावांमध्ये शिबिरांचे आयोजन केले जात आहे. त्यास शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
.....................
स्मशानभूमी, शेड उभारण्याची मागणी
वाशिम : तालुक्यातील अनसिंग परिसरातील अनेक गावांमध्ये अद्याप अंत्यसंस्कार करण्यासाठी सुसज्ज स्मशानभूमी किंवा शेड उभारण्यात आलेले नाही. यामुळे विशेषत: पाऊस आल्यास अंत्यसंस्कारात अडचणी निर्माण होत आहेत.
....................
वन्यप्राण्यांचा हैदोस, शेतकरी वैतागले
वाशिम : जिल्ह्यातील कोठारी (ता.मंगरूळपीर) परिसरात निलगाय, रानडुक्कर, हरीण या वन्यप्राण्यांनी अक्षरश: हैदोस घातलेला आहे. कोवळ्या पिकांचे वन्यप्राण्यांकडून नुकसान केले जात असून वनविभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.