महामार्गावर प्रवासी निवाऱ्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:49 AM2021-09-17T04:49:43+5:302021-09-17T04:49:43+5:30
-------- मुख्य मार्गावरील पथदिवे दुरुस्तीची मागणी वाशिम : जिल्ह्यात ग्रामीण भागांतील मुख्य मार्गावरचे पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. वारंवार ...
--------
मुख्य मार्गावरील पथदिवे दुरुस्तीची मागणी
वाशिम : जिल्ह्यात ग्रामीण भागांतील मुख्य मार्गावरचे पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. वारंवार मागणी करूनही हे पथदिवे दुरुस्त करण्यात आले नाही. पावसाळ्यात रात्रीच्या सुमारास विजेची अत्यावश्यकता भासते. ही बाब लक्षात घेऊन गावातील काही ठिकाणचे नादुरुस्त असलेले पथदिवे विनाविलंब दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
^^^^^^^^^^^^^^^
वन्यप्राण्यांमुळे सोयाबीन पीक संकटात
वाशिम : यंदा जिल्ह्यात ३ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. अनेक नैसर्गिक संकटातून हे पीक सावरले असून, पिकाच्या शेंंगा परिपक्व झाल्या आहेत. यंदाच्या पिकांपासून चांगल्या उत्पन्नाची आशा असताना रानडुकरे आणि रोही या पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
^^^^
ग्रामीण रस्त्यांची अवस्था वाईट
वाशिम : गेल्या कित्येक दिवसांपासून वाशिम ते पुसद महामार्गावरील ग्रामीण रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. अनेक रस्त्यांवरील डांबरीकरण नाहीसे होऊन मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनधारकांना अडचणींचा सामना करीत मार्ग काढावा लागत आहे. यातून एखादवेळी मोठा अपघात घडून जीवितहानी होण्याची भीती आहे.