ग्रामीण रुग्णालयांना कार्डिओलॉजिक ॲम्बुलन्स पुरविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:51 AM2021-06-09T04:51:05+5:302021-06-09T04:51:05+5:30
प्रहार जनशक्ती विधिमंडळ पक्ष कार्यालयाच्या वतीने राज्याचे गृह राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना वाशिम जिल्हा आकांक्षित ...
प्रहार जनशक्ती विधिमंडळ पक्ष कार्यालयाच्या वतीने राज्याचे गृह राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना वाशिम जिल्हा आकांक्षित जिल्हा असल्याने तसेच राजकीयदृष्ट्या दुर्लक्षित राहिल्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हा जिल्हा विकासात मागासलेला आहे. शासनाचे अनेक मोठे प्रकल्प व योजना या जिल्ह्यात कार्यान्वित होऊ शकलेल्या नाहीत. वाशिम जिल्ह्यात ग्रामीण गावांची संख्या व लोकसंख्या या तुलनेत असलेली पायाभूत आरोग्य सुविधा अपुरी आहे. गेल्या १५ वर्षांपासून जिल्ह्यातून लोकसंख्येच्या तुलनेत नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रे निर्मिती करण्याचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आलेला आहे. तसेच तसेच मंगरूळपीर आणि काही अन्य ग्रामीण रुग्णालयांमधील ५० खाटांच्या १०० घाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्याचे प्रस्तावसुद्धा शासनस्तरावर पाठविण्यात आलेली आहेत. अशा प्रकारचे प्रस्ताव वारंवार पाठवूनसुद्धा मंजुरी मिळू शकलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांना प्रत्येकी एक याप्रमाणे कार्डिओलॉजिक ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देणे, मंगरूळपीर व कारंजा येथील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक प्रमाणात जागा उपलब्ध असल्याने त्या ठिकाणी कायमस्वरूपी कोविड केअर सेंटर व ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे बांधकाम करून कार्यान्वित करणेबाबतच्या कामांना आपल्या पुढाकारातून मंजुरी दिल्यास जिल्ह्यात चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा निर्माण होऊ शकते. त्यामुळे याप्रकरणी लक्ष घालून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.