मंगरूळपीर पालिकेच्या व्यापारी संकुलाचा पुन्हा लिलाव करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 03:52 PM2018-04-25T15:52:49+5:302018-04-25T15:52:49+5:30
संकुलातील ४५ गाळे रिकामे करून पुन्हा त्याचा लिलाव करावा अशी मागणी माजी नगरसेवक ओमप्रकाश शर्मा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारी निवेदनाद्वारे केली आहे.
मंगरुळपीर - मंगरूळपीर नगर पालिकेने काही वर्षांपूर्वी व्यापारी संकुलातील ४५ दुकाने तीस वर्षासाठी भाड्याने दिले होते. परंतु त्यास आजपर्यंत वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. या संकुलातील ४५ गाळे रिकामे करून पुन्हा त्याचा लिलाव करावा अशी मागणी माजी नगरसेवक ओमप्रकाश शर्मा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद आहे की, या संकुलातील काही गाळेधारकांनी लाखो रुपये घेऊन इतर लोकांना परस्पर दुकाने विकली आहेत. तसेच काहींनी पोट भाडेकरू ठेऊन हजारो रुपये घेतले आहेत. पालिकेने ठराव क्रमांक तीन द्वारे ३० आॅगस्ट २००४ पर्यंत गाळे धारकांना मुदतवाढ दिली होती. याला सुद्धा पंधरा वर्षांचा कार्यकाळ झाला आहे. हा प्रकार विद्यमान पालिका मुख्याधिकाºयांना कळविण्यात आला होता. याची दखल घेऊन मुख्याधिकाºयांनी गाळेधारकांना गाळे रिकामे करण्याचे आदेशसुद्धा दिले आहेत. परंतु काही जण गाळे धारकांना पुन्हा मुदतवाढ देण्याचा कट रचत आहेत, असे निवेदनात नमूद आहे. त्यामुळे हे गाळे भाड्याने देऊन तीस वर्षाचा कालावधी झाल्याने स्थायी निर्देश २४चे उल्लंघन झाले असून या नियमबाह्य कृतीचे विरुद्ध १ मे पासून नगर पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा शर्मा यांनी दिला.
मंगरूळपीर पालिकेचे शर्मा यांना पत्र
यासंदर्भात पालिका मुख्याधिकाऱ्यांनी २३ एप्रिल रोजी शर्मा यांना पत्र दिले असून पालिकेने ३ जून २०१७ रोजी ठराव क्रमांक २५ नुसार सर्वसाधारण सभेने भाडे निश्चित करण्यासाठी मंजुरी प्रदान केली असून भाडे निश्चित करण्यासाठी २६ आॅक्टोबर २०१७ रोजी सहायक संचालक नगर रचना यांचेकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतु यामध्ये त्रुटी असून याची पूर्तता झाल्यावर तसेच सहायक संचालक यांनी केलेली भाडेनिश्चिती व जिल्हाधिकारी यांचे त्रिसदस्यी समितीच्या अहवालानुसार सदरची कारवाई करण्यात येणार असल्याचे या पत्रात नमूद आहे.