‘त्या’ निर्णयाबाबत फेरविचार करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:43 AM2021-05-27T04:43:51+5:302021-05-27T04:43:51+5:30
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनात घोपे यांनी नमूद केले आहे की, राज्य सरकारने महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांमध्ये गृह ...
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनात घोपे यांनी नमूद केले आहे की, राज्य सरकारने महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांमध्ये गृह विलगीकरणावर बंदी घातली आहे. संबंधित जिल्ह्यांत रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना संस्थात्मक विलगीकरणात दाखल करण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्याचाही १८ जिल्ह्यांमध्ये समावेश आहे; मात्र वाशिम जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर नाहीत. कोरोनाबाधितांच्या तुलनेत खासगी कोविड सेंटर कमी आहेत. अशात गृहविलगीकरण बंद केले, तर यंत्रणेवर मोठा ताण येईल. कदाचित हा अतिरिक्त ताण यंत्रणेकडून पेलला जाणार नाही. नव्याने काही कोविड केअर सेंटर तसेच क्वारंटाईन सेंटर्सची निर्मिती करावी लागेल. त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ व पैसाही खर्च होणार आहे. त्यामुळे निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी नागेश घोपे यांनी केली आहे.