खताचे दर कमी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:37 AM2021-05-22T04:37:08+5:302021-05-22T04:37:08+5:30

...................... नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई वाशिम : विनाकारण घराबाहेर पडणे, तोंडाला मास्क न लावणाऱ्या २० पेक्षा अधिक लोकांवर शहर ...

Demand for reduction of fertilizer rates | खताचे दर कमी करण्याची मागणी

खताचे दर कमी करण्याची मागणी

Next

......................

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

वाशिम : विनाकारण घराबाहेर पडणे, तोंडाला मास्क न लावणाऱ्या २० पेक्षा अधिक लोकांवर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने शुक्रवारी दुपारच्या सुमारास कारवाई केली. यादरम्यान स्थानिक पाटणी चाैकात चोख बंदोबस्त तैनात असल्याचे दिसून आले.

..................

एकबुर्जी प्रकल्पाची पाणीपातळी खालावली

वाशिम : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाच्या पाणीपातळीत घट झाली आहे. ही बाब लक्षात घेता नागरिकांनी अपव्यय टाळून काही दिवस पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन न.प.कडून करण्यात आले.

...............

खासगी रुग्णालयांत रुग्णसंख्या घटली

वाशिम : मे महिन्याच्या प्रारंभी कोरोना विषाणू संसर्गाने बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. यामुळे खासगी रुग्णालये रुग्णांच्या गर्दीने हाऊसफुल्ल दिसायची. गेल्या तीन ते चार दिवसांत मात्र रुग्णसंख्या घटल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे.

..............

शहर पोलिसांकडून रात्रगस्त वाढली

वाशिम : पोलीस दलाच्या ताफ्यात नव्याने चारचाकी व दुचाकी वाहने दाखल झाली आहेत. त्याआधारे पोलिसांकडून रात्रगस्त वाढविण्यात आली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम होत असून चोऱ्यांचे प्रमाण घटल्याचे दिसून येत आहे.

..................

देयक थकबाकी वसुलीला ‘ब्रेक’

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यापासून महावितरणकडून विद्यूत देयक थकबाकी वसुलीला ‘ब्रेक’ देण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यापुर्वी मार्चअखेर कोट्यवधी रुपयांची वसूली करण्यात आली, हे विशेष.

Web Title: Demand for reduction of fertilizer rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.