रासायनीक खतांच्या किंमती कमी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:44 AM2021-05-20T04:44:31+5:302021-05-20T04:44:31+5:30

खासदार गवळी यांनी सदर पत्रात नमूद केले की, मागील एक ते सव्वा वर्षापासून कोविड-१९ या कोरोना संकटामुळे देश ...

Demand for reduction in prices of chemical fertilizers | रासायनीक खतांच्या किंमती कमी करण्याची मागणी

रासायनीक खतांच्या किंमती कमी करण्याची मागणी

Next

खासदार गवळी यांनी सदर पत्रात नमूद केले की, मागील एक ते सव्वा वर्षापासून कोविड-१९ या कोरोना संकटामुळे देश व राज्य पातळीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे शेतकऱ्यांनी अत्यंत मेहनतीने पीकविलेल्या शेतातील भाज्या, फळे, फुले यासह इतर पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाची नुकसान भरपाइ ही शेतकऱ्यांच्या नुकसानाच्या प्रमाणात पुरेशी नव्हती. त्यातच यावर्षी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या रासायनिक खतांच्या कंपन्यांनी रासायनिक खतामध्ये जवळपास ६० टक्यापर्यंत दरवाढ केलेली आहे.परिणामी शेतकरी आर्थिक कोंडीत सापडल्याचे गवळी यांनी पत्रात म्हटले आहे. विविध प्रकारच्या आर्थीक संकटांना शेतकरी तोंड देत असतांना काही दिवसावर येवून ठेपलेल्या पावसाळयाच्या तोंडाशी रासायनिक खतांच्या किंमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली. या वाढीमुळे देशातील शेतकरी शेतीचे नियोजन करीत असतांना प्रचंड प्रमाणात आर्थीक संकटात सापडेला आहे. शेतकऱ्यांच्या आर्थीक अडचणींचा विचार करून केंद्र शासनाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रासायनिक खत कंपन्यांनी वाढविलेले दर कमी करावे अशी मागणी खासदर भावना गवळी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांना केली आहे.

Web Title: Demand for reduction in prices of chemical fertilizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.