भोयणी, म्हसणी सिंचन तलाव दुरुस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:55 AM2021-02-27T04:55:07+5:302021-02-27T04:55:07+5:30
इंझोरी: मानोरा तालुक्यातील म्हसणी आणि भोयणी येथील सिंचन तलावांची स्थिती वाईट आहे. या तलावाच्या भिंतीवर झुडपे वाढल्याने धोका निर्माण ...
इंझोरी: मानोरा तालुक्यातील म्हसणी आणि भोयणी येथील सिंचन तलावांची स्थिती वाईट आहे. या तलावाच्या भिंतीवर झुडपे वाढल्याने धोका निर्माण झाला असून, ही झुडपे तोडण्यासह आवश्यक दुुरुस्ती करण्याची मागणी जि.प. सदस्य विनादेवी जयस्वाल यांनी जि.प. जलसंधारण विभागाकडे केली आहे. या पत्रानुसार आवश्यक कार्यवाही करण्याच्या सुचनाही जि.प. अध्यक्ष चंदक्रांत ठाकरे यांनी दिल्या आहेत.
मानोरा तालुक्यातील जि.प. जलसंधारण विभागांतर्गत म्हसणी आणि भोयणी येथील सिंचन तलावाच्या भिंतीवर झुडपे वाढली आहेत, तसेच भिंती दबल्याने त्यांची उंची कमी झाली असून, गाळही मोठ्या प्रमाणात साचला आहे. त्यामुळे या तलावात आवश्यकतेपेक्षा कमी जलसंचय होतो. परिणामी, वेळेपूर्वीच हे तलाव कोरडे पडत असल्याने शेतकऱ्यांना सिंचनात अडचणी येतात. ही बाब लक्षात घेत जि.प. सदस्य विनादेवी जयस्वाल यांनी जि.प. जलसंधारणच्या मानोरा उपविभागीय अभियंत्यांना पत्र सादर करून या तलावांची पावसाळ्यापूर्वी आवश्यक दुरुस्ती करणे, तसेच गाळाचा उपसा करून भिंतीवरील झुडपे छाटण्याची मागणी केली आहे. या मागणीनुसार आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही जि.प. अध्यक्षांनी दिल्या आहेत.