धाेकादायक विद्युत तारा बदलण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:46 AM2021-05-25T04:46:13+5:302021-05-25T04:46:13+5:30
शिरपूर जैन हे अतिदाट लाकवस्ती असलेले गाव आहे. येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ पाहावयास मिळते. येथील विजेच्या संदर्भातील व्यवस्था अतिशय ...
शिरपूर जैन हे अतिदाट लाकवस्ती असलेले गाव आहे. येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ पाहावयास मिळते. येथील विजेच्या संदर्भातील व्यवस्था अतिशय जुनी आहे. पूर्वी विरळ लोकवस्ती व रस्त्यांची उंची कमी असल्याने वीज वाहिनीच्या तारा अडचणींच्या ठरत नव्हत्या. वीज वाहिनीची व्यवस्था ही जवळपास ५० वर्षांपूर्वीची आहे. आता गावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अतिदाट लाकवस्ती निर्माण झाली आहे. त्यातच मागील काही वर्षात गावात झालेली रस्त्याची कामे व त्यावर वेळोवळी टाकण्यात आलेल्या मुरुमाच्या भरावामुळे रस्त्यांची उंची वाढली आहे. त्यामुळे पूर्वीच्या वीज तारांचे जमिनीपासून अंतर कमी झाले. कुठं कुठं तर घराच्या छतावरून गेलेल्या तारा धोकादायक ठरत आहेत. तसेच जुन्या झालेल्या वीज वाहिनीच्या तारा बसस्थानक परिसर व गणपती तथा दुर्गा देवी मिरवणूक मार्गावर धोकादायक ठरत आहेत. यापासून एखादी अप्रिय घटना घडू नये म्हणून येथील बसस्थानक परिसर व मिरवणूक मार्गांवरील जुन्या तारा बदलून एरियल बंच केबल लावण्यात याव्यात, अशी मागणी दिनेश गाडे यांनी शिरपूर महावितरण कार्यालयाकडे केली आहे. मात्र, याची दखल अद्याप घेण्यात आली नाही.