रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:27 AM2021-07-04T04:27:53+5:302021-07-04T04:27:53+5:30
................ बांधकाम साहित्याचे दर वधारले वाशिम : ग्रामीण भागात पंतप्रधान घरकुल योजना, शबरी घरकुल योजना, रमाई घरकुलासह विविध योजनांअंतर्गत ...
................
बांधकाम साहित्याचे दर वधारले
वाशिम : ग्रामीण भागात पंतप्रधान घरकुल योजना, शबरी घरकुल योजना, रमाई घरकुलासह विविध योजनांअंतर्गत घरकुलांचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे बांधकाम साहित्याची मागणी वाढली असून दरांतही वाढ झाली आहे.
................
पावसाअभावी पाणीपातळीत होतेय घट
वाशिम : चालू वर्षी पावसाळ्यात सुरुवातीला दमदार पाऊस झाला; मात्र अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे विशेषत: कूपनलिकांच्या पाणीपातळीत घट झाल्याचे दिसून येत आहे.
..............
सबलीकरण योजनेला गती देण्याची मागणी
वाशिम : जिल्ह्यात समाजकल्याण विभागांतर्गत दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी शेकडो प्रस्ताव सादर केले; मात्र मंजुरी मिळत नसल्याने योजनेला खीळ बसल्याचे दिसत आहे.
......................
पुलांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव प्रलंबित
वाशिम : जिल्ह्यात गत महिन्यात अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामुळे काही ठिकाणचे पूल नादुरुस्त झाले. दुरुस्तीचे प्रस्ताव संबंधित यंत्रणेकडे पाठविण्यात आले; मात्र ते प्रलंबित आहेत.
...............
‘समृद्ध गाव’मार्फत ऑनलाईन प्रशिक्षण
वाशिम : समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत कारंजा व मंगरूळपीर तालुक्यांतील गावांमध्ये ऑनलाईन प्रशिक्षण देणे सुरू आहे. या माध्यमातून विविध विषयांवर मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे यांनी दिली.