रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:25 AM2021-07-05T04:25:42+5:302021-07-05T04:25:42+5:30
................ ऑनलाईन कार्यशाळेस युवकांचा प्रतिसाद वाशिम : ‘कौशल्यातून रोजगाराकडे - शेती व शेतीपूरक व्यवसाय’ या विषयावर २ जुलै रोजी ...
................
ऑनलाईन कार्यशाळेस युवकांचा प्रतिसाद
वाशिम : ‘कौशल्यातून रोजगाराकडे - शेती व शेतीपूरक व्यवसाय’ या विषयावर २ जुलै रोजी मोफत ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. त्यास युवकांचा प्रतिसाद मिळाल्याचे सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी सांगितले.
.................
वरिष्ठ श्रेणीचे २७ प्रस्ताव पात्र
वाशिम : माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयास आतापर्यंत वरिष्ठ श्रेणीचे ६२ प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी २७ प्रस्ताव पात्र ठरविण्यात आले आहेत, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी रमेश तांगडे यांनी दिली.
.......................
मुख्य रस्त्यावरील रपटा नादुरुस्त
मानोरा : तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेला रपटा नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे २९ जून रोजी एक चारचाकी वाहन फसले होते. त्याला बाहेर काढताना चांगलीच कसरत करावी लागली.
....................
पशुपालकांनी लाभ घेण्याचे आवाहन
वाशिम : पशुसंवर्धन विभागामार्फत आदिवासी लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्याचा पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.