घर बांधकाम परवानगीसाठी ४५ हजार रुपयांची मागणी;  नगर रचना सहायक जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 05:34 PM2021-02-08T17:34:47+5:302021-02-08T17:35:13+5:30

Bribery News नितेश ओमप्रकाश चौरसिया याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ८ फेब्रुवारी रोजी मंगरूळपीर येथून ताब्यात घेतले.

Demand for Rs 45,000 for house building permit; Town planning assistant arrested | घर बांधकाम परवानगीसाठी ४५ हजार रुपयांची मागणी;  नगर रचना सहायक जेरबंद

घर बांधकाम परवानगीसाठी ४५ हजार रुपयांची मागणी;  नगर रचना सहायक जेरबंद

Next

वाशिम : ४५ हजार रुपये द्या आणि दुकान व घराचा बांधकाम परवाना घेऊन जा, असे म्हणत लाचेची मागणी करणाºया मंगरूळपीर नगर परिषदेतील रचना सहाय्यक (वर्ग दोन) नितेश ओमप्रकाश चौरसिया याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ८ फेब्रुवारी रोजी मंगरूळपीर येथून ताब्यात घेतले.
मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने जवळपास तीन ते चार महिने घर, दुकानांची बांधकामे प्रभावित झाली होती. त्यानंतर बांधकामांना परवानगी मिळाल्याने अनेकजण विविध प्रकारच्या बांधकामांकडे वळले असल्याचे दिसून येते. दुकान किंवा घर बांधकाम करण्यासाठी नगर परिषदेची परवानगी बंधनकारक आहे. मंगरूळपीर येथील एका ५३ वर्षीय तक्रारदार इसमाने दुकान व घर बांधकामासाठी परवानगी मिळावी यासाठी रितसर अर्ज सादर केला. रचना सहाय्यक नितेश चौरसिया याने दुकान व घर बांधकाम परवानगी देण्याकरीता तक्रारदाराकडे ४५ हजार रुपयाची मागणी केली. तडजोडीअंती ३५ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविल्यानंतर २५ जानेवारी व २७ जानेवारी रोजी पडताळणी करण्यात आली. यावेळी आरोपीने ३५ हजार रुपये लाच स्विकारण्याची तयारी दर्शविल्याचे आढळून आले. सापळा कारवाईदरम्यान आरोपीला तक्रारदाराचा संशय आल्याने लाचेची रक्कम स्विकारली नाही. याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले असून, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारीत २०१८) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, पोलीस उप अधीक्षक एस. व्ही.शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक एन.बी बोराडे व चमूने पार पाडली.

Web Title: Demand for Rs 45,000 for house building permit; Town planning assistant arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.