कलावंत मानधन समिती स्थापन करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:25 AM2021-07-22T04:25:28+5:302021-07-22T04:25:28+5:30
गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कलावंत मानधन समितीच स्थापन झाली नसल्यामुळे जिल्ह्यातील शेकडो वृध्द कलावंतांचे प्रस्ताव मंजुरीअभावी धूळखात पडले आहेत. ...
गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कलावंत मानधन समितीच स्थापन झाली नसल्यामुळे जिल्ह्यातील शेकडो वृध्द कलावंतांचे प्रस्ताव मंजुरीअभावी धूळखात पडले आहेत. जीवनभर सांस्कृतिक व पारंपरिक कलेचा वारसा जोपासणाऱ्या वृध्द कलावंतांना उतारवयात शासनाच्या मदतीची गरज आहे. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे हे कलावंत मदतीपासून वंचित असून त्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे तातडीने वृध्द कलावंत, साहित्यिक मानधन समिती स्थापन करावी, कलावंतांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, वृध्द कलावंतांचे मानधन प्रती महिना ५००० रुपये करावे, ज्यांना घरे नाहीत अशा कलावंतांना घरकूल द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, परिवर्तन कला महासंघाचे कार्याध्यक्ष साहेबराव सुरवाडे, रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांच्या मार्गदर्शनात देण्यात आलेल्या निवेदनावर परिवर्तन कला महासंघाचे जिल्हाध्यक्ष शेषराव मेश्राम, रिसोड तालुकाध्यक्ष शाहीर दत्ता वानखडे, सचिव रमन गायकवाड, लोडजी भगत, जनार्दन भालेराव, सुरेश श्रृंगारे, महिला अध्यक्षा लीलावती गायकवाड, विशाखा इंगळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.