सुसज्ज कोविड सेंटर उभारण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:45 AM2021-04-28T04:45:14+5:302021-04-28T04:45:14+5:30

निवेदनात नमूद आहे की, वाशिम शहर व ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. स्वाभाविकच उपलब्ध आरोग्य सुविधा अपूर्ण पडत ...

Demand for setting up of well equipped Kovid Center | सुसज्ज कोविड सेंटर उभारण्याची मागणी

सुसज्ज कोविड सेंटर उभारण्याची मागणी

Next

निवेदनात नमूद आहे की, वाशिम शहर व ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. स्वाभाविकच उपलब्ध आरोग्य सुविधा अपूर्ण पडत आहेत. या सुविधांमध्ये प्रामुख्याने प्राणवायूचा पुरवठा कमी पडत असून, तुटवडा जाणवत आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. अतिशय कमी प्रमाणात पुरवठा होतो त्यामुळे ती चढ्या दराने विकली जात आहेत. वाशिम येथे रुग्णांत्या नातेवाइकांना हाणामारीची दुर्दैवी घटना घडल्याची जनसामान्यांत चर्चा आहे. रुग्णालयामध्ये खाटांची संख्या अपुरी पडत आहे. या सर्व कमतरता दुर करण्याची व वेळीच रुग्णांना पुरेशा सुविधा उपलब्ध करणेबाबत आरोग्य प्रशासनाला सुचना देण्यात याव्यात. रुग्णांची फरफट होवू नये, वेळीच उपचार मिळावेत, जिवनरक्षक सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरीता जादाचे कोविड सेंटर उभारण्यात यावे. याकरीता शासकीय दवाखान्याचे जवळच असलेल्या जि.प. चे अखत्यारीत असलेल्या माजी शासकीय विद्यालयाचे आवारातील सांस्कृतीक भवनाचा, जुन्या न.प. च्या आवारातील वाचनालयाची इमारत किंवा न.प.ची प्राथमिक कन्या शाळा यापैकी इमारतीचा उपयोग कोविड सेंटर करीता घेण्यात यावा. हे सेंटर किमान १०० खाटांचे सोयी सुविधायुक्त असावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद आहे की, वाशिम शहर व ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. स्वाभाविकच उपलब्ध आरोग्य सुविधा अपूर्ण पडत आहेत. या सुविधांमध्ये प्रामुख्याने प्राणवायूचा पुरवठा कमी पडत असून, तुटवडा जाणवत आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. अतिशय कमी प्रमाणात पुरवठा होतो त्यामुळे ती चढ्या दराने विकली जात आहेत. वाशिम येथे रुग्णांच्या नातेवाइकांना हाणामारीची दुर्दैवी घटना घडल्याची जनसामान्यांत चर्चा आहे. रुग्णालयामध्ये खाटांची संख्या अपुरी पडत आहे. या सर्व कमतरता दूर करण्याची व वेळीच रुग्णांना पुरेशा सुविधा उपलब्ध करणेबाबत आरोग्य प्रशासनाला सूचना देण्यात याव्यात. रुग्णांची फरफट होऊ नये, वेळीच उपचार मिळावेत, जीवनरक्षक सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता जादाचे कोविड सेंटर उभारण्यात यावे. याकरिता शासकीय दवाखान्याच्या जवळच असलेल्या जि.प.च्या अखत्यारीत असलेल्या शासकीय विद्यालयाच्या आवारातील सांस्कृतिक भवनाचा, जुन्या न.प.च्या आवारातील वाचनालयाची इमारत किंवा न.प.ची प्राथमिक कन्या शाळा यापैकी एका इमारतीचा उपयोग कोविड सेंटरकरिता करण्यात यावा. हे सेंटर किमान १०० खाटांचे सोयी-सुविधांयुक्त असावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Demand for setting up of well equipped Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.