युवा कौशल्य विद्यापीठ उभारण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:28 AM2021-07-15T04:28:01+5:302021-07-15T04:28:01+5:30
कोरोनामुळे अनेक युवकांच्या खासगी नोकऱ्या गेल्या, व्यवसायाला फटका बसला. स्पर्धेच्या या युगात प्रत्येकाला शासकीय, निमशासकीय नोकरी मिळणे याची शाश्वती ...
कोरोनामुळे अनेक युवकांच्या खासगी नोकऱ्या गेल्या, व्यवसायाला फटका बसला. स्पर्धेच्या या युगात प्रत्येकाला शासकीय, निमशासकीय नोकरी मिळणे याची शाश्वती नाही. त्या तुलनेत शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, स्वयंरोजगारासाठी प्रेरणा देणे गरजेचे ठरत आहे. जागतिक औद्योगिकीकरण लक्षात घेता तांत्रिक प्रशिक्षणाची अत्यंत गरज असून कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून युवक, युवती, महिलांना स्वयंरोजगार उभारता येतील. युवक-युवती स्वावलंबी होण्यासह इतरांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतील व माध्यमातून बेरोजगारीच्या समस्येवर तोडगा निघेल. वाशिम जिल्ह्याची केंद्र शासनाच्या यादीमध्ये आकांक्षित जिल्हा म्हणून नोंद आहे. जिल्ह्यात युवा कौशल्य विद्यापीठ नाही. कौशल्य विद्यापीठ उभारण्यासाठी जिल्ह्या अनुकूल असून यामुळे जिल्ह्याचे मागासलेपण दूर होण्याकरिता मदत होईल. जिल्ह्यात युवा कौशल्य विद्यापीठ उभारण्याची मागणी राजकुमार पडघान यांच्यासह युवकांनी केली.