शेतकऱ्यांच्या मागण्या सोडविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:38 AM2021-03-07T04:38:11+5:302021-03-07T04:38:11+5:30
मानोरा तहसीलदार यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनात समितीचे अध्यक्ष देवराव राठोड यांनी म्हटले की, मानोरा तालुक्यातील अनेक शेतकरी यांना कर्जमाफी मिळाली ...
मानोरा तहसीलदार यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनात समितीचे अध्यक्ष देवराव राठोड यांनी म्हटले की, मानोरा तालुक्यातील अनेक शेतकरी यांना कर्जमाफी मिळाली नाही, प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हा प्रश्न सोडवावा,
जिल्ह्यात बाजार समितीमध्ये कुठेच धान्य अडत घेतल्या जात नाही, मात्र मानोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडत घेतल्या जाते, ती बंद केली पाहिजे, ज्यांनी आपले कर्ज भरले अशा शेतकरी यांचे सातबारा उतारावरील बोजा कमी करावा, अशी मागणी मानोरा कारंजा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. आदी मागण्यांची २० मार्चपूर्वी पूर्तता करावी, अन्यथा समितिमार्फत २१ मार्चपासून उपोषण केल्या जाईल, असा इशारा समितीचे अध्यक्ष देवराव राठोड (नाईक), कार्यकारी अध्यक्ष गजानन राठोड यांनी निवेदनात दिला आहे.