‘त्या’ गाैण खनिज उत्खननाच्या चाैकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:39 AM2021-02-10T04:39:56+5:302021-02-10T04:39:56+5:30
वाशिम : अकाेला-नांदेड महामार्गाकरिता माेंटाे कार्लाे प्रा. लि. कंपनीने मेडशी ते वाशिम रस्त्याकरिता गाैण खनिजाचे उत्खननाची चाैकशी करण्यात ...
वाशिम : अकाेला-नांदेड महामार्गाकरिता माेंटाे कार्लाे प्रा. लि. कंपनीने मेडशी ते वाशिम रस्त्याकरिता गाैण खनिजाचे उत्खननाची चाैकशी करण्यात यावी अशी मागणी डाॅ. राधाकिसन मधुकर क्षीरसागर, कृषी क्रांती मंच व काशिनाथ बाबा भक्त मंडळासह चिवरा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
मेडशी-वाशिमपर्यंत महामार्गाचे काम सुरू असून, सदर काम माेंटाे कार्लाे कंपनी करीत आहे. या कंपनीने रस्त्याकरिता उत्खनन करून गाैण खनिज हे खिर्डा, डव्हा येथील शेतशिवारात पर्यावरण नियमाच्या विरुद्ध टेकड्यांचे खाेदकाम केले आहे. यामुळे या शिवारातील शेतकऱ्यांच्या कृषक जमिनीला बाधा निर्माण झाला आहे. तसेच खासगी शेतजमिनीतूनसुद्धा गाैण खनिजाची उचल करून कृषक शेतजमिनीचे नुकसान केले आहे. तसेच चिवरा येथील सरकारी ई-क्लास शेतजमिनीत संबंधित रस्त्याकरिता पाणी उपलब्ध व्हावे या करिता एक माेठे शेततळे अर्धवट तयार करून साेडून देण्यात आले आहे. तसेच या रस्त्याच्या कामासाठी पाण्याचे माेठे टॅंकर झाेडगा-चिवरा रस्त्यावरून नेल्याने रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. परंतु कंपनीला विचारले असता काेणतेच उत्तर दिले जात नाही. यासंबंधी संबंधितांना वारंवार निवेदनही देण्यात आली आहे; मात्र यांची दखल घेतल्या जात नसल्याने याची चाैकशी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर डाॅ. राधाकिसन क्षीरसागर, किरण कंकाळ, प्रल्हाद पाटील गिद, संताेष विठ्ठल पवार, माणिक डाेंगरे, सतीश सराेदे, कैलास गिद आदी शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी वरिष्ठांनासुद्धा पाठविण्यात आल्या आहेत.