रस्ता काम गतीने करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:27 AM2021-07-08T04:27:35+5:302021-07-08T04:27:35+5:30
............. रस्ता दुभाजकाचा प्रश्न प्रलंबित वाशिम : ‘हार्ट ऑफ सिटी’ असलेल्या पाटणी चाैकातून लाखाळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक सुरळीत राहण्यासाठी ...
.............
रस्ता दुभाजकाचा प्रश्न प्रलंबित
वाशिम : ‘हार्ट ऑफ सिटी’ असलेल्या पाटणी चाैकातून लाखाळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक सुरळीत राहण्यासाठी दर्जेदार दुभाजक असणे गरजेचे आहे. मात्र, हा प्रश्न प्रलंबित असून, संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
...............
‘एचआरसीटी’वरच विशेष भर
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्याऐवजी खासगी डाॅक्टरांकडून ‘एचआरसीटी’चा सल्ला दिला जात असून, ‘स्कोअर’च्या आधारेच उपचार केले जात असल्याचे दिसून येत आहे.
.............
स्प्रिंकलरद्वारे पिके वाचविण्याची धडपड
वाशिम : सुरुवातीला कोसळलेल्या पावसाने नंतर दीर्घ दडी मारल्याने पिके संकटात सापडली आहेत. यामुळे ज्यांच्याकडे पाणी आहे, त्यांनी स्प्रिंकलरद्वारे पाणी देत पिके वाचविण्याची धडपड चालविली आहे.
.............
वाशिम, मालेगावात प्रत्येकी एक रुग्ण
वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्गाने बाधित होणाऱ्यांचा आलेख दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. बुधवारी आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार वाशिम आणि मालेगाव या दोन तालुक्यांत प्रत्येकी केवळ एकच रुग्ण आढळून आला.
...............
उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्याची मागणी
वाशिम : पुसद रस्त्यावरील रेल्वे गेटनजीक तीन वर्षांपूर्वी सुरू झालेले उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या या कामामुळे वाहतूक विस्कळीत होत असून, गती देण्याची मागणी होत आहे.
.................
रस्ता नादुरुस्त; नागरिक हैराण
वाशिम : शहरातील मन्नासिंह चौकापासून कालेश्वर मंदिरापर्यंतचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त झाला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नागरिक हैराण झाले आहेत. न.प.ने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
..............
जुने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत
वाशिम : जुने शहरात मंगळवारी नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र, तो अत्यल्प स्वरूपात होता. यामुळे अनेकांना आवश्यक तेवढ्या प्रमाणात पाणी मिळाले नाही. याकडे स्थानिक नगरपरिषदेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
.............
खासगी वाहनांकडून नियमाचे उल्लंघन
वाशिम : ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या नागरिकांना सायंकाळी पाचनंतर शक्यतोवर वाहन मिळत नाही. त्यामुळे खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत असून, या वाहन चालकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसत आहे.
................
दुकानांमधील गर्दीने कोरोनाची भीती
वाशिम : सायंकाळी चार वाजेनंतर शहरातील सर्वच प्रकारची दुकाने बंद होत असली, तरी त्यापूर्वी मात्र तुफान गर्दी होत असल्याने कोरोना संसर्ग पुन्हा पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
..............
वाहने मिळाल्याने पोलिसांची सोय
वाशिम : जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात काही दिवसांपूर्वी नवी दुचाकी वाहने समाविष्ट करण्यात आली. यामुळे विशेषत: रात्रगस्तीवर राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची सोय झाली आहे.
...............
स्वच्छतागृहाची दुरवस्था
मालेगाव : तहसील कार्यालयानजीक असलेल्या बस स्थानकात मूलभूत सुविधा नाहीत. स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असून, दुर्गंधी सुटत असल्याने चालक, वाहक व प्रवाशांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
............
गतिरोधकाअभावी अपघाताची शक्यता
वाशिम : वाशिम ते मंगरुळपीर या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, जागमाथा मंदिरापर्यंत या रस्त्याला गतिरोधक नसल्याने अपघातांची शक्यता उद्भवली आहे. गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे.
.....................
वाहतूक ठप्प, वाहन चालक त्रस्त
वाशिम : शहरातील पोस्ट ऑफिस चौकातून गेलेल्या महामार्गावर बुधवारी दुपारच्या सुमारास वाहतूक जागीच ठप्प झाली होती. यामुळे वाहन चालक त्रस्त झाले. राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने, हा प्रश्न उद्भवल्याची माहिती आहे.
.................
बेघरांना घरकूल देण्याची मागणी
वाशिम : २०११ पूर्वीपासून शासकीय जमिनीवर वास्तव्य करणाऱ्यांच्या नोंदी नमुना नंबर ८ ला घेतल्या नाहीत. यामुळे अनेक जण घरांपासून वंचित आहेत. त्यांना घरकूल उपलब्ध करून देण्याची मागणी पी.एस. खंदारे यांनी केली.