काेचिंग क्लासेस सुरु करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 04:04 AM2021-06-12T04:04:43+5:302021-06-12T04:04:43+5:30
वाशिम : कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षांपासून जिल्ह्यातील बंद असलेले कोचिंग क्लासेस १४ जूनपूर्वी सुरू करण्यात यावे ,या मागणीसाठी ...
वाशिम :
कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षांपासून जिल्ह्यातील बंद असलेले कोचिंग क्लासेस १४ जूनपूर्वी सुरू करण्यात यावे ,या मागणीसाठी कोचिंग क्लासेस असोसिएशनने (सीसीए) गुरुवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा कमी होत असताना महाराष्ट्र शासनाने अनलॉकचे चार टप्पे पाडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले असून याठिकाणी मॉल, चित्रपटगृहे,सर्व बाजारपेठ खुली करण्यात आली आहे .ज्ञानदानाची शिकवण देणारे कोचिंग क्लासेस अद्यापही बंद ठेवण्यात आले आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधकारमय झाले आहे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी जिल्ह्यातील सर्व कोचिंग क्लासेस त्वरित सुरू करण्यात यावे. आपल्या मागणीसाठी कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या संचालक,प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी शिवाजी चौक,आंबेडकर चौक व जिल्हाधिकारी कार्यालय येथे मानवी साखळी पद्धतीने उपस्थिती देऊन आपला रोष व्यक्त केला. या निवेदनात कोचिंग क्लासेस खुली करण्यास परवानगी द्यावी अन्यथा आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी अशीही मागणी करण्यात आली . मागील दीड वर्षांपासून कोचिंग क्लासेस,काॅम्प्युटर क्लासेस,एमपीएससीचे क्लासेस बंद आहेत. एमपीएससीची परीक्षा जवळ आली असल्यामुळे विद्यार्थी वर्ग अभ्यासापासून वंचित आहे.तर दुसरीकडे संपूर्ण शिक्षक वर्ग व इतर कर्मचारी यांचे पगार बंद असल्यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत.त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी नियमावली करून आपणास परवानगी द्यावी. शासकीय नियमांचे पालन करून तसेच पालकांचे संमती पत्र घेऊन क्लासेस चालू करण्यात येतील असे नमूद करून सीसीएच्या वतीने भाडे माफी संदर्भात आदेश काढावा,कोचिंग क्लासेसला लघु व्यवसायांमध्ये समाविष्ट करून बँक द्वारे कर्ज उपलब्ध करून द्यावे इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर सीसीए जिल्हाध्यक्ष प्रा. अतुल वाळले,जिल्हा प्रवक्ता प्रा. भागवत सावके, जिल्हा सचिव कल्पेश राऊत, जिल्हा उपाध्यक्ष जे. डी. देशमुख ,जिल्हा समन्वयक अनिल धुमकेकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रवीण पाटील, भांडे, तालुका अध्यक्ष दिलीप महाले,तालुका उपाध्यक्ष दिनेश काशीकर, रोहिदास बांगर, सहकोषाध्यक्ष मुसळे, तालुका सचिव खराटे,पश्चिम विदर्भ राज्यकार्यकारिणी सदस्य गोपाल वांडे, तालुका संघटक सावंत, तालुका कार्याध्यक्ष मुठाळ, तालुका प्रवक्ता पठाण, गौरकर,तालुका सहसमन्वयक धाबे, प्रसिद्धीप्रमुख गौर, जिरवणकर, बिटोडे,अवचार, जिल्हा कोषाध्यक्ष कहाते, सह प्रवक्ता नवघरे, घनश्याम राऊत, अनसिंग येथील संजय गोटे,विपुल वाळली,रिसोड येथील सरदार , पवार , अकील आदींची उपस्थिती होती.