शौचालयांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:45 AM2021-03-09T04:45:30+5:302021-03-09T04:45:30+5:30
निवेदनात म्हटले आहे की, शौचालय ऑनलाईन प्रक्रिया आतापर्यंत ३ ते ४ वेळा शासनाकडून राबविण्यात आली. यापूर्वी बेसलाईन यादी तयार ...
निवेदनात म्हटले आहे की, शौचालय ऑनलाईन प्रक्रिया आतापर्यंत ३ ते ४ वेळा शासनाकडून राबविण्यात आली. यापूर्वी बेसलाईन यादी तयार केली. ती यादी तहसील कार्यालयामार्फत शिधापत्रिकांचा आधार घेऊन करण्यात आली. परंतु, त्या यादीची मुदत संपली तरी लोकांपर्यंत माहिती पोहोचलेली नाही. लोकांपर्यंत माहिती गेली, तोपर्यंत बेसलाईनमध्ये लाभ देणे बंद झाले होते. त्यानंतर बेसलाईन वगळता नवीन यादी तयार करण्याचे शासनाचे आदेश होते. त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. मोजक्याच लाभार्थिंची नावे ऑनलाईन करण्यात आली. त्यामुळे सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर सैय्यद अकील यांच्यासह एम. एस. तुरूकमाने, प्रा. रंगनाथ धांडे, संतोष शिंदे, जितेंद्र जमधाडे, गुलाब मस्के, महेश तिडके, अर्जुन डोंगरदिवे, निंबाजी सबादिंडे, प्रदीप खंडारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.