भूखंडाची खरेदी सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:02 AM2021-02-23T05:02:04+5:302021-02-23T05:02:04+5:30
............. रोहित्र नादुरुस्त; शेतकरी त्रस्त केनवड : केनवड परिसरातील विद्युत रोहित्राचा प्रश्न पूर्णपणे निकाली निघाला नाही. नादुरुस्त विद्युत रोहित्र ...
.............
रोहित्र नादुरुस्त; शेतकरी त्रस्त
केनवड : केनवड परिसरातील विद्युत रोहित्राचा प्रश्न पूर्णपणे निकाली निघाला नाही. नादुरुस्त विद्युत रोहित्र बदलून देण्यास विलंब होत असल्याने सिंचन प्रभावित होत आहे. याकडे महावितरणने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तलाव दुरुस्तीसाठी प्रशासनाला निवेदन
कारंजा : येथून जवळच असलेल्या जामदरा घोटी येथील सिंचन तलाव लिकेजमुळे कोरडा पडला आहे. यामुळे रब्बी पिके संकटात सापडली असून, पुढील वर्षी ही समस्या उद्भवू नये यासाठी नियोजन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे बुधवारी निवेदनाद्वारे केली.
कोरोनाविषयी जनजागृती
अनसिंग : सावंगा जहागीर येथील रामचंद्र बहूद्देशीय कला संस्थेच्या आयोजनातून कळंबा महालीसह अनसिंग, वारा, काटा, पार्डी टकमोर आदी गावांमध्ये कोरोनाची लक्षणे, उपचार व बचावाबाबत कलावंतांकडून जनजागृती करण्यात आली.
देयके अदा करण्यासाठी निवेदन
ताेंडगाव : बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग व सिंचन विभागांतर्गत विविध स्वरूपातील कामे करूनही अनेक कंत्राटदारांची देयके मिळालेली नाहीत. देयके अदा करण्याची मागणी कंत्राटदार संघटनेने सोमवारी संबंधित त्या-त्या विभागांकडे केली.