पाण्याची टाकी सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:43 AM2021-03-27T04:43:01+5:302021-03-27T04:43:01+5:30
या भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. याकडे संबधितांचे दुर्लक्ष हाेत असल्याने २६ मार्च राेजी ...
या भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. याकडे संबधितांचे दुर्लक्ष हाेत असल्याने २६ मार्च राेजी के.न.कॉलेज परिसरातील पाण्याची टाकी सुरू करण्यासंबंधीचे निवेदन नगर परिषदेला वंचित बहुजन आघाडी शहर कार्यकारिणीच्यावतीने देण्यात आले.
याआधी पाणी समस्येबद्दल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला निवेदन दिले होते , त्यावेळी शाखा अभियंता यांनी सांगितले होते कि, आधी नगर पालिकेमधून टाकीची समस्या दूर करा तेव्हा तुमचे नळ येतील. त्यानुसार नगरपालिकेला निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाची दखल घेतली गेली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी निवेदनातुन देण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यांनी सर्व प्रकरणावर योग्य कारवाई करू असे आश्वासन यावेळी दिले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सचिन खांडेकर, तालुका संघटक देवराव कटके, तालुका उपाध्यक्ष शेषराव चव्हाण, वर्षाताई धनद्रवे, उज्वला खडसे, मोनिका खिल्लारे, सुशीला गेटे, प्रतिज्ञा मोहोड, सुनीता गेटे, शुभम सिरसाट, अतुल धनद्रवे, अजिक्य मोहोड, अभिजित वानखडे, आनंद गोलभाने, पवन खरात, बाबाराव धनद्रवे. इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.