मंगळसा धरणाचे काम सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:26 AM2021-06-21T04:26:21+5:302021-06-21T04:26:21+5:30
निवेदनात म्हटले आहे की, वाशिम सिंचनाचा असलेला अनुशेष भरून काढण्यासाठी मंगळसा येथील धरणाचे काम मंजूर झाले. या धरणामुळे साधारणत: ...
निवेदनात म्हटले आहे की, वाशिम सिंचनाचा असलेला अनुशेष भरून काढण्यासाठी मंगळसा येथील धरणाचे काम मंजूर झाले. या धरणामुळे साधारणत: दोन हजार एकर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. धरणातील पाण्याचा उपयोग मंगरुळपीर तालुक्यातील बहुतांश गावांमधील शेताला, तसेच मंगरुळपीर शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याकरिता होणार आहे.
पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंगळसा येथील धरण तालुक्याचे, तसेच जिल्ह्याचेही कदाचित शेवटचे धरण आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर या धरणाचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय कौमी एकता संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुख्तार खान पटेल, शिवसेना तालुकाप्रमुख रामदास सुर्वे, मो. हारुन शेख, अ. बशर सौदागर, शरद झंझाड, रजाउल्लाह सौदागर, इमरान उलहक, राजू वार्डेकर आदींची उपस्थिती होती.