रिसोड ते मेहकर रस्ता काम सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:26 AM2021-06-30T04:26:20+5:302021-06-30T04:26:20+5:30
सार्वजनिक बांधकाम कार्यालयास दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रिसोड बसस्थानकापासून ते मेहकर जाणारा मुख्य रस्ता नादुरुस्त असून ...
सार्वजनिक बांधकाम कार्यालयास दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रिसोड बसस्थानकापासून ते मेहकर जाणारा मुख्य रस्ता नादुरुस्त असून जागाेजागी खड्डे पडले आहेत. हा रस्ता अनेक महामार्गावर जाण्यासाठी जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. पावसाळा सुरू झालेला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साठत असल्याने रस्त्याची खाेली दिसून येत नाही. रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अन्यथा वाकद बसथांब्यावर ९ जुलै राेजी सकाळी ९ वाजता वंचित बहुजन आघाडी रिसोडच्यावतीने रास्ता रोको अंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सय्यद अकील,
रंगनाथ धांडे, प्रदीप खंडारे, प्रल्हाद कोकाटे, मनोज देशमुख, मोहसीन खान, महेश तिडके, कडूजी आल्हाड, प्रल्हाद आल्हाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.