लाईनमन मुख्यालयी राहण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:31 AM2021-06-01T04:31:24+5:302021-06-01T04:31:24+5:30
................... जऊळका येथील रस्त्याची दुरवस्था वाशिम : जऊळका रेल्वे (ता.मालेगाव) येथील काही ठिकाणच्या अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. ग्रामपंचायतीने ...
...................
जऊळका येथील रस्त्याची दुरवस्था
वाशिम : जऊळका रेल्वे (ता.मालेगाव) येथील काही ठिकाणच्या अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. ग्रामपंचायतीने याकडे लक्ष पुरवून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
........................
नुकसान भरपाई मिळण्याची मागणी
वाशिम : १९ मार्च २०२१ रोजी सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस आणि गारपीट होऊन बिजवाई कांद्याचे नुकसान झाले होते. असे असताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. ती देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
..................
ग्रामीण रुग्णांकडे विशेष लक्ष
वाशिम : कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर गृहविलगीकरणात असलेल्यांनी गावस्तरीय विलगीकरणात दाखल व्हावे, असे आवाहन करण्यासह अशा रुग्णांवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे.
........................
भाजीविक्रेत्यांना मिळाला दिलासा
वाशिम : प्रशासनाच्या निर्बंधामुळे गेल्या काही दिवसापासून सकाळच्या सुमारास केवळ चार तास व्यवसाय सुरू ठेवावा लागत असे. आता मात्र आणखी तीन तास मिळणार असून, भाजीविक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे.
................
वाशिममध्ये २८ जण पॉझिटिव्ह
वाशिम : सोमवारी आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, शहर व तालुक्यात विविध ठिकाणचे २८ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
.................
मूत्रीघरांची स्वच्छता करण्याची मागणी
वाशिम : स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील मूत्रीघरांची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. पुरेशा प्रमाणात पाणी नसल्याने ही समस्या सध्या बिकट झाली आहे.
..................
प्रवाशांनी ‘मास्क’ वापरण्याचे आवाहन
वाशिम : एस.टी.ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी खबरदारी म्हणून तोंडाला ‘मास्क’चा वापर करावा. यासह एस.टी.त चढताना व उतरताना ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळावे, असे आवाहन आगारप्रमुख विनोद इलामे यांनी केले आहे.
..............
वाहतूक विस्कळीत, नागरिक त्रस्त
वाशिम : पाटणी चौक व रिसोड नाका येथे विशेषत: सकाळच्या सुमारास वाहतूक विस्कळीत होत आहे. यामुळे विशेषत: पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.